Best Marathi Motivational Speech to be Success. | How to Achieve Success?

This is the Best Marathi Motivational Speech Post ever. This post is for those who want to quit their life and having no motivation inside.

Are you tired? Do you want to give up on your goal? You are in the right place, dear friend. This Marathi Motivational Speech is going to change your life right now. As this post is in the Marathi language let’s have a quick introduction.
आयुष्य जगत असताना खूप चढ उतार येत राहतात. नकारात्मक परिस्थितीमध्ये कधीच हार मानू नका. आजची पोस्ट ही तुम्हाला प्रेरणा देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ही पोस्ट वाचा व त्याच्यावर विचार करा.

Best Marathi Motivational Speech to be Success.

थकला आहेस? नको वाटतंय का? सगळं सोडून देऊ वाटतंय?
एक काम कर. एकदा नीट विचार कर, का केली होतीस रे सुरुवात? हा? चार चौघात सांगून बसलायस, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मोठया मोठ्या बाथा मारल्यास.
best marathi motivation
अगदी पेटून उठला होतास. छाती ठोकून सांगत होतात, ‘मी नाही करणार तर कोण करणार?’ कुठं गेला तो वाघ?? यातना होत आहेत, मग एवढ्यातच हार मानणार का रे??
अरे फोड डरकाळी. तुझ्या डरकाळीतल सामर्थ्य ओळख.
मोबाईल मध्ये तोंड घालून बसू नकोस. काय ठेवलंय रे त्यात?  ऐक माझं. एक काम कर. फक्त एक दिवस माझ्या सांगण्यावरून Switch Off कर तो Mobile आणि दे तुझ्या ध्येयाला पूर्ण वेळ.
फक्त एक दिवस, कर जीवापाड मेहनत, कर मन लावून अभ्यास. आहे नाही तेवढा जीव पणाला लावून एक दिवस, फक्त एक दिवस मेहनत कर रे, आणि बघ, तूच बघ, जेवढ तू एका दिवसात करु शकलास ना, तेवढं चार दिवसांत तुला जमलं नसत.
एका दिवसात एवढा आत्मविश्वास कमावशील ना, की तुलाच तुझावर विश्वास बसणार नाही. करून बघ रे एकदा आणि सवय लाव.. तोपर्यंत करत राहा जोपर्यंत मिळणार नाही. life सेट नाही झाली ना तर पाहिजे ते हरील.
कोणतंही युद्ध जिंकलं जात, अतूट विश्वासाने, जिद्दीने, कधीही हार न मानणाऱ्या Attitude ने.  मोठ्या-मोठ्या बाथा करून काहीही मिळत नाही.
लक्षात ठेव, फक्त जिंकण्यावर कधीच लक्ष देऊ नकोस. शिकण्यावर लक्ष दे. जे ध्येय निवडलंयस ना, त्यासाठी पेटून उठ, मेहनत कर, बघणाऱ्याचे हृदय पेटून उठल पाहिजे. तुझ्या मेहनतीपुढे जग नतमस्तक झालं पाहिजे.
Winner बनणे सोपं काम नाही. अवघड तर कधीच नाही. तुझी जिद्द Winner बनण्यासाठी तुला मजबूर करून टाकेल.
हे माझ्याकडून होणारच नाही. असा विचार तर तू करूच नकोस. हा विचार तू सुरुवात करण्याच्या आधी करायला हवा होतास!!! आत्ता नाही करायचं असा विचार..  जर केलास विचार तर संपलास!!!
Success काय एका रात्रीत मिठी मारायला येत नाही.  त्यासाठी स्वतःला झिजवायला लागत, यातना सहन कराव्या लागतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो.  
जर तुझा निश्चय पक्का आहे, विश्वास अतूट आहे तर कोणाच्या बापात हिम्मत नाही तुला पुढे जाण्यापासून रोखण्याची.
आज तू खूप कष्ट करत आहेस, दररोज लढत आहेस स्वतःशी. होऊ शकत Success तुला आत्ता नाही भेटणार, होऊ शकत थोडा अजून time लागेल पण यश हे तुला भेटणारच.
पण लक्षात ठेव ही तीच वेळ आहे मेहनतीची जी तुला उद्या इतरांपेक्षा वेगळा अस्तित्व देणार आहे.
सगळं काही शक्य आहे या जगात. जे लोक बोलतात ना की तुझ्याकडून हे होणार नाही, ते नेहमी असच बोलत राहणार. कारण ते स्वतःच्या ऐपतीप्रमाणे बोलत असतात.
त्यांना माहीत असता की स्वतःकडून हे कधीच होणार नाही. त्यांचा एकच म्हणणं असत, अरे मी नाही करू शकत, तर हा कालचा पोरगा काय करणार आहे?’
काही फरक पडत नाही तुझा Background काय आहे, गरीब आहेस का श्रीमंत आहेस. फरक पडतो तो म्हणजे, तू किती मेहनत घेतलिस, फरक पडतो ते म्हणजे तू किती वेगाने, जिद्दीने पंख घडफडवलेस. फरक पडतो की किती तू Successful झालंयस.
Legend बनणं खायची गोष्ट नाही. Legend तर ते लोक असतात जे हा विचार करत नाहीत की लोक काय बोलतील? ते हा विचार नाही करत की किती मेहनत घ्यावी लागनार आहे?
ते फक्त आपल्या ध्येयासाठी लढत राहतात, दिवसेंदिवस. तोपर्यंत मेहनत करताय जोपर्यंत जिंकण्याचा स्वाद चाखत नाहीत.
Mo Farah हे नाव कदाचित तू ऐकले असशील. लहानपणी एका छोट्याशा Accident मध्ये पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टर बोलले नीट चालता येणार नाही.
माहीत नाही का ही गोष्ट Moh Farah च्या हृदयाला लागली.  पेटून उठला जिद्दीनं! डॉक्टरला चुकीचं ठरविण्यासाठी.. डॉक्टरला चुकीचं ठरविण्यासाठी हा माणूस एवढ्या पुढे निघून गेला.
कुठचा कुठं जाऊन पोहचला स्वतःच स्वतःला समजलं नाही. कुठे तो चालू पण शकत न्हवता, कुठे धडाधड Running करू लागला.
कुठं त्याला चालता येत न्हवता, तिथं त्यानी मॅडल्सची लाईन लावली. नवीन Record बनवू लागला, स्वतःचेच record तोडायला लागला.
दोस्ता, खऱ्या मेहनतीची मजा तेव्हाच येते जेव्हा माणूस स्वतःचेच Record स्वतः तोडायला लागतो. इथं पण तेच झालं! पहिल्या 5km ची race 14 मिनिटं 12 सेकंदात धावला.
Olympic मध्ये पण पळायला लागला, आणि एवढा धावला, एवढा धावला की Rio Olympic मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी पहिला आला.
मित्रा, पेटून उठायला लागत, हो. पेटूनच उठायला लागत. जेवढं मोठं तुझं स्वप्न आहे, तेवढी मोठी किंमत पण तुला द्यावी लागणार.
अशी माणसं Time Manage नाही करत बसत.. अरे, Time Manage तर ती लोक करतात जे आळशी असतात.
या जिद्दी लोकांच्या डोक्यात घड्याळ फिट झालेलं असतं.  सकाळी लवकर उठण्यासाठी त्यांना गजर लावायची गरज पडत नाही त्यांना.
जेव्हा तुझा Alarm  वाजतो ना, तेव्हा हे लोक Ground वर Practice करत असतात, घाम गाळत असतात..!  ते विचार नाही करत किती मेहनत करायची आहे. फक्त थांबत नाहीत!
Legend बनण्यासाठी रोज मरावं लागत!
मी लोकांकडून ऐकलंय, फक्त एक महिना पळा म्हणजे पाय दुखणार नाही, त्रास होणार नाही. पूर्ण खोटी गोष्ट आहे ही, अक्षरशः खोटी गोष्ट आहे!
ज्यांना Record बनवायचे असतात ना, त्यांची फुफ्फुसे रोज फाटतात. रोज ते कालपेक्षा जास्त मेहनत करतात. रोज ते नवीन रेकॉर्ड बनवायच्या नादात, बॉडीला तापावतात, झिजवतात.
जर हा माणूस वयाच्या 33 व्या वर्षी Olympic मध्ये पहिला येऊ शकतो. मग तुझ वय तर खूप कमी आहे. अरे, वाघ आहेस तू! फोड डरकाळी मर्दा आणि लाग कामाला. अजूनही वेळ गेलेली नाही.
I hope you love this Marathi Motivational Speech. Well, let us know your valuable feedback.

Leave a Comment